। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मांडवखार गावाच्या रहिवासी आनंदी नथुराम मोकल यांचे रविवारी (दि.6) वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. अत्यंत शांत आणि सदा मितभाषी असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पार्थिवावर मांडवखार गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध शैक्षणिक आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आनंदी मोकल यांच्या पश्चात दोन मुलगे आणि पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य सोमवारी, दि 16 मार्च रोजी श्री क्षेत्र भुवनेश्वर येथे होणार आहे.