शिवाजी राणे यांचे निधन

। अलिबाग । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील शिवाजी बाबाजी राणे यांचे वृध्दापकाळाने शनिवारी (दि.27) रोजी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 81 वर्षे होते. ते शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी कावीळ रोगाचे अनेक रुग्ण बरे केले होते. तसेच, ते को.ए.सो कै. ध. श. खोपकर शाळेचे सदस्य होते.

त्यांच्या पार्थिवावर परहूरपाडा येथील स्मशानभूमीत शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, ग्रामस्थ, नातेवाईक तसेच पंचक्रोषीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यां‍च्या पश्चात दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार (दि.6) मे रोजी होणार असल्याची माहिती त्याच्या कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version