| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कामोठे वसाहतीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रिया सिंग असे या विद्यार्थिनीचे नाव असून, नवी मुंबईमधील अपोलो रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पालिकेकडे डेंग्यूच्या 7 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मलेरियाच्या 35 रुग्णाची नोंद आहे. पालिका क्षेत्राबाहेरील आकडेवारी यामध्ये समाविष्ट नसल्याने हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.सध्या डेंग्यूची साथ वाढत असल्याने नागरिकांनी खबारदारी घेण्याचे आवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
दरम्यान, कामोठेमधील या घटनेनंतर कामोठे कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेत शहरात फवारणी व धुरीकरण वाढविण्याची मागणी केली आहे. यावेळी. डॉ सखाराम गारळे, राहुल आग्रे यांच्यासह फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.