| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील पळस येथील रहिवासी सुराजी रामा इंद्रे यांचे मंगळवारी (दि.2) निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्षाचे होते. ते अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाने सर्वाना परिचित होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर व समस्त पळस ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सुना, नातवंडे व मोठा इंद्रे परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवारी (दि.11) तर उत्तरकार्य विधी रविवारी (दि.14) त्यांच्या पळस येथील रहात्या निवास्थानी होणार आहेत.