| पनवेल | प्रतिनिधी |
अपघातात जखमी झालेल्या महादेव सीताराम वाघे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. कोली कोपर कातकरवाडी येथील महादेव सिताराम वाघे (वय 40) हा नेरे येथे गाई गोठ्यात नेण्याचे काम करण्यासाठी गेला होता. तो नेरे हायस्कूल समोरील रस्त्याकडून जाणार्या रस्त्याच्या कडेला झाडाखाली झोपला असताना हिरव्या रंगाच्या अनोळखी कारचालकाने त्याच्या पोटावरून कार घेऊन कार चालक नेरे बाजूकडे जाणार्या रोडने पळून गेला. यात महादेव वाघे हा जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू होते. चार जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालक कार घेऊन पळून गेला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत