आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू: संबंधितांवर कडक कारवाईची मागणी

। मुंबई । वार्ताहर ।
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी करीत सरकारला धारेवर धरले. तसेच भविष्यात असे मृत्यू रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, असा सवाल आ. पाटील यांनी केला असता याबाबत चौकशीसाठी समिती गठीत आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

दरम्यान, 22 विद्यार्थ्यांचा श्‍वसन आजार, अ‍ॅनेमिया, सिकलसेल, मोठ्या आतड्यांचा आजार, 26 विद्यार्थी गळफास घेऊन, 44 विद्यार्थी अपघातात, 31 विद्यार्थी पाण्यात बुडून, 29 विद्यार्थी सर्पदंश होऊन, 8 विद्यार्थी विजेच्या धक्क्याने, 2 विद्यार्थी अन्नातून विषबाधा होऊन, तर 3 विद्यार्थ्यांचा भाजून मृत्यू आहे. यावर आदिवासी विकास खात्याचे मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, आदिवासी विकास नाशिक अंतर्गत 214 शासकीय आश्रमशाळा तसेच 211 अनुदानित आश्रमशाळा आहेत. मात्र, नाशिक विभागात विद्यार्थ्यांची मृत्यूसंख्या जास्त आहे. याकरिता शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू कारणाचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी डॉ. सुभाष सेवानिवृत्त महासंचालक, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

या समितीने दिलेल्या अहवालानुसार, यापुढे होणार्‍या प्रत्येक मृत्यू प्रकरणाची त्वरित दखल घेऊन प्राथमिक चौकशी करणे, विद्यार्थी मृत्युचे वैद्यकीय सामाजिक दृष्टीने विश्‍लेषण करणे, प्रत्येक प्रशासकीय स्तरावर त्वरित कार्यवाही होणे किंवा कसे याबाबत त्रैमासिक आढावा घेण्याच्या दृष्टीने 28 डिसेंबर 2016 शासन निर्णयानुसार प्रकल्प स्तरावर आपत्कालीन आढावा गट, वैद्यकीय सामाजिक आढावा समिती तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या असून, त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार यांनी यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

Exit mobile version