आ.जयंत पाटील यांचे सरकारला आवाहन
| मुंबई | दिलीप जाधव |
शेतकरी,आदिवासी, कष्टकरी बांधवांच्या न्याय मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी नाशिकहून पायी चालत निघालेल्या मोर्चाला मंत्र्यांनी सामोरे जाऊन मोर्चेकर्यांना आश्वस्त करावे असे आवाहन शेकाप आम. जयंत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत सरकारला केले. त्यांच्या आवाहनाची दखल घेत सरकारतर्फे मोर्चेकर्यांशी चर्चा करायला दादा भुसे,अतुल सावे हे ज्येष्ठ मंत्री तातडीने नाशिकला रवानाही झाले.
सभागृहात या मुद्यावर बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले की, सहा वर्षापूर्वी या संदर्भात मी पुढाकार घेऊन कष्ठकरी शेतकर्यांचे प्रश्न मांडले होते.तत्कालीन त्यावर देवेंद्र फडणवीस सरकारने मागण्या मंजूर करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती.नाशिकचे पालक मंत्री या नात्याने गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने त्यांना आश्वासित केले होते. मात्र त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.यावर सरकारने तातडीने बैठक घेऊन त्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात अशी मागणी ही जयंत पाटिल यांनी केली.
यावर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले की ज्येष्ठ सदस्य यंत पाटिल यांनी सांगितलेली वस्तुस्थिति खरी आहे.मोठ्या प्रमाणात आदिवासी यावेळी उपसभापती नीलम गोर्हे यांनी शासनाने मोर्चेकर्यांच्या ज्या मागण्या शक्य आहेत त्या त्वरित सोडवाव्यात, शेतकरी ,कष्टकरी समाजाचा विधिमंडळावर विश्वास आहे. मागण्यांबाबत काय तोड़गा काढला ते सभागृहात निवेदन करावे,असे निर्देश दिले.