| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
डोंगराच्या मागील बाजूने धबधब्याच्या जाण्याच्या प्रयत्नात दोघेजण खाली पडल्याची घटना तालुक्यातील आदई येथे घडली असून यात दोघाचा मृत्यू झाला आहे. आदई धबधबाच्या डोंगरावर 30 ऑगस्ट रोजी 7 जण गेले होते. पाठीमागील बाजूने चढून यापैकी 2 इसम पाय घसरून पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रदीप कामी (7) आणि पारस बाकी (30, दोघेही रा. सुकापुर) असे दोघांची नावे असून ते दोघे मामा भाचे आहेत. याची माहिती खांदेश्वर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व दोघांना रुग्णालयात पुढील सोपस्कारासाठी नेले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.