| सुधागड-पाली | वार्ताहर |
युनिटी फ्रेंड्स ग्रुप पाली ग.बा. वडेर हायस्कूल दहावी बॅच सन 1996 च्या माजी विद्यार्थ्यांकडून अनेक शाळा व अंगणवाडी यांना शैक्षणिक व इतर साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण भागातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांचे शिकणे सुकर व्हावे या उद्देशाने तब्बल 70 हजारांहून अधिक रुपयांच्या साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. रा.जि.प.शाळा महागाव व अंगणवाडी, रा.जि.प. शाळा लोलगेवाडी व अंगणवाडी, राजीप भोप्याची वाडी व अंगणवाडी राजीप देऊळवाडी शाळा व अंगणवाडी, राजीप शाळा कवेलेवाडी व अंगणवाडी, कोंडप अंगणवाडी, पडसरे आश्रम शाळा व अंगणवाडी आणि वरवणे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, पाट्या, दप्तर, खुर्च्या, घड्याळ, बैठक पट्ट्या, बिस्कीट पुडे ,चॉकलेट यांसारखे शैक्षणिक व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन शिक्षक गणेश चोरघे यांनी केले होते. कार्यक्रमास मंगेश कडव, बाळकृष्ण भोईर, मंगेश लखिमळे, सुजित बारस्कर, गणेश चोरघे, परेश घरत, रवींद्र घायले, श्रीकांत मोरे, अयाज पानसरे, योगेश तुरे, सुशील पोतदार, गणेश कोंजे, विनायक सोडिये, निलेश जाधव ,महेश ठोंबरे, मंगेश ठोंबरे, राजेंद्र महाडिक आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.