चोरी करताना तरुणाचा मृत्यू; मित्रांनी केले असे काही कृत्य

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यातील खानापूर पाबे घाट रस्त्यावरील रांजणे येथे चोरी करताना 150 फुटावरुन मित्र मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी गुन्ह्याबद्दल कोणाला समजू नये यासाठी मृत्युमुखी पडलेल्या मित्राला पाबे खिंडीतील दुर्गम डोंगरातच खड्डा करून पुरले. बसवराज पुरंत मॉगनमनी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो 22 वर्षांचा होता.

गुरुवारी (दि.8) मध्यरात्री रात्री वेल्हे पोलिसांना याबाबत माहिती समजली. त्यानंतर शुक्रवारी (दि.9) सायंकाळी उशिरा सिंहगड रोड पोलिस आणि वेल्हे पोलिसाचे पथक आरोपीनां घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अंधार आणि पावसामुळे पहाटे साडेतीन पर्यंत घटनास्थळाचा शोध लागला नाही, मागच्या महिन्यात 13 जुलै रोजी हि घटना घडलेली आहे. अजून मृतदेह तरुणाचा सापडलेला नाही. पोलीस तपास आजून सुरु आहे.

Exit mobile version