| पुणे | प्रतिनिधी |
किल्ले राजगड येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची झाल्याची घटना रविवारी (दि.26 ) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. अनिल विठ्ठल आवटे (18) सध्या रा.पुणे मूळ गाव खादगाव, असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धायरी येथील पोलिस भरती अकॅडमीमधील शंभरहून अधिक जणांचा ग्रुप रविवारी ट्रेकिंगसाठी किल्ले राजगडावर आला होता. पाली दरवाज्याच्या वरच्या बाजूस माकडे होती माकडे इकडे तिकडे उड्या मारताना वरून दगड अनिलच्या डोक्याजवळ पडला. दगड डोक्यात पडल्याने त्याच्या कानातून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अनिल हा पोलीस भरतीच्या तयारी साठी धायरी येथे चुलत्यांकडे राहत होता. पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी खासगी क्लासेस मध्ये तयारी करत होता. प्रजासत्ताक दिन असल्याने याच प्रशिक्षण संस्थेच्या इतर सहकाऱ्यांसमवेत अनिल हा राजगड किल्ला फिरण्यासाठी आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही रुग्णालयात पोहोचले, याबाबत अधिक तपास वेल्हे पोलीस स्टेशनचे ज्ञानदीप धिवार करीत आहेत.