| नवी मुंबई | प्रतिनिधी |
कोपरखैरणे येथून मुलुंड येथे जाणाऱ्या महिलेच्या स्कुटीला भरधाव ट्रेलरने धडक दिली. या अपघातात 9 वर्षीय हेयांश सुतार चाकाखाली आल्याने घटनास्थळावरच मृत्यू झाला. ऐरोली-मुलुंड मार्गावर शनिवारी (दि.25) दुपारी ही घटना घडली.
मुलुंड पश्चिमेला राहणाऱ्या हेयांश आई लक्ष्मी सुतार सोबत कोपरखैरणे येथील शाळेत गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास आईसह स्कुटीवरून मुलुंड येथील घरी परतत असताना दुपारच्या सुमारास ऐरोली मुलुंड मार्गावरील दिवा सर्कलजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. अपघातात रस्त्यावर पडलेला हेयांशचा ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला. रबाळे पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. ऐरोली-मुलुंड मार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.