पुण्याकडे जाणार्या प्रवाशांचे हाल
नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जतकर रेल्वे प्रवाशांवर अन्यायकरण्याचे सत्र कायम ठेवले आहे. डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत स्थानकातील अधिकृत थांबा रद्द करुन आरक्षण तिकिट देखील देणे बंद केले आहे.दरम्यान,मध्य रेल्वेच्या या कारभारामुळे पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी असलेली गाडी आता उपलब्ध होणार नसल्याने प्रवासी वर्ग नाराज झाला आहे.
डेक्कन एक्स्प्रेसचा पूर्र्वीीपासुन कर्जत रेल्वे स्थानकात अप आणि डाऊनला अधिकृत थांबा होता आणि आरक्षित तिकिट देखील कर्जत रेल्वे स्थानकातून दिले जात होते.त्यामुळे प्रामुख्याने कर्जत येथून लोणावळा,पुणे भागात जाणार्या रेल्वे प्रवाशांना चांगली सोय होत होती. रेल्वे प्रशासनाने अचानकपणे डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत रेल्वे स्थानकातील अधिकृत थांबा रद्द करुन आरक्षित तिकिट देणेही बंद केले. त्यामुळे कर्जत ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या प्रवाशांचे तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डेक्कन एक्स्प्रेससह इतरही अनेक मेल एक्स्प्रेस गाड्यांचाही रेल्वे प्रशासनाने कर्जत थांबा रद्द केला आहे.