पेट्रोल कितीही महाग झाले तरी गाडीवरच फिरणार ; अलिबाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निर्धार

अभिनव आंदोलनातून केला केंद्र सरकारचा निषेध

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

केंद्र सरकारच्या महागाई विरोधात आज अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अभिनव निषेध आंदोलन केले. बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून निषेध फेरी काढत महागाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अलिबाग तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक तालुका अध्यक्ष मनोज शिर्के यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात संदीप गोठीवरेकर हेमनाथ खरसंबळे, नौशाद पटेल, सुनील गुरव, सुबोध केळकर, हर्ष ढवळे, सचिन पाटील, अरमान शेख, निलेश नागे आदी उपस्थित होते.

Exit mobile version