• Login
Monday, March 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

गरिबांना आरक्षण देणारा निर्णय

Varsha Mehata by Varsha Mehata
November 17, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
138
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा. अविनाश कोल्हे

मागच्या सोमवारी म्हणजे सात नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निकालाद्वारे आपल्या देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. हा खटला म्हणजे ‘जनहित अभियान विरूद्ध केंद्र सरकार’ हा होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला शैक्षणिक प्रवेशात तसेच सरकारी नोकर्‍यांंत 10 टक्के आरक्षण देण्याच्या मोदी सरकारचा निर्णय वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाचा हा निर्णय 3 विरूध्द 2 असा आहे. मात्र या आरक्षणातून अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना वगळण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे असे मत नोंदवत न्यायमुर्ती लळित आणि उदय भट या निकाल्याच्या विरोधात मत व्यक्त केले आहे.
आपल्या देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना वगळून फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देणे हे धोरण राज्यघटनेच्या मूळ उद्देशांच्या विरोधात आहे, असं म्हणत अशा आरक्षणाला फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. असा आदेश मध्यप्रदेश सरकारने काढला होता. या आदेशाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. हे आव्हान नंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यासाठी पाच न्यायमुर्तींचे खंडपीठ गठीत केले. आता त्याच खंडपीठाचा निर्णय आलेला आहे.
या घटनेची दुसरी बाजू म्हणजे मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देणारी 103 वी घटनादुरूस्ती संसदेत जानेवारी 2019 मध्ये सादर केली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ही घटनादुरूस्ती जानेवारी 2019 मध्ये संमत केली होती. या विधेयकाच्या बाजूने लोकसभेत 323 मतं तर विरोधात फक्त 3 मतं पडली होती. राज्यसभेत ही दुरूस्ती 165 विरूद्ध सात मतांनी संमत झाली होती. या घटनादुरूस्तीलासुद्धा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
आता मुद्दा असा की या नव्या प्रकारच्या आरक्षणाचे लाभार्थी कोण असतील? खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक. संबंधित व्यक्तीचे व त्याच्या कुटूंबियांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. उत्पन्न मोजण्यासाठी शेती, उद्योग आणि इतर व्यवसायातील उत्पन्न एकत्र करण्यात येईल. या अटींशिवायसुद्धा काही अटी आहेत. लाभार्थीकडे पाच एकरापेक्षा जास्त कृषीजमीन नसली पाहिजे. शिवाय लाभार्थीकडे असलेल्या घराचे क्षेत्रफळ दोनशे चौरस मीटरपेक्षा जास्त नसावे. जर घर दोनशे चौरस मीटरपेक्षा जास्त असल्यास ते पालिकाक्षेत्रात नसावे. या आरक्षणाच्या लाभार्थीकडे उत्पन्न आणि मालमत्तेचे प्रमाणपत्र असले पाहिजे. हे प्रमाणपत्र तहसीलदार किंवा त्याच्या समकक्ष अधिकार्‍यांंकडून मिळालेले असले पाहिजे. मुख्य म्हणजे या प्रमाणपत्राचे दरवर्षी संबंधित अधिकार्‍यांंकडून प्रमाणित केले पाहिजे.
आपल्या देशात 1952 सालापासून केंद्र सरकारच्या पातळीवर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण धोरण राबवण्यात येत आहे. 1990 सालापासून मंडल आयोगामुळे ओबीसींनासुद्धा आरक्षण लागू झाले. त्याच दरम्यान उच्चजातींतील गरीब वर्गसुद्धा आरक्षणाची मागणी करू लागला. या संदर्भात महाराष्ट्रातील पाटील समाज, गुजराथेतील पटेल समाज वगैरे चटकन आठवणारी नावं. काही अभ्यासकांच्या मते अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना मिळणार्‍या आरक्षणामुळे सवर्णातील गरीब समाजात संतापाची लाट उसळली. यातूनच समाजातील उच्चवर्णीय पण आर्थिकदृष्ट्या गरीब समाजालासुद्धा आरक्षण देता येईल का, या पर्यायाचा विचार सुरू झाला.
या समोर आलेल्या नव्या पर्यायाच्या मार्गात अनेक अडथळे होते. या दहा टक्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली कमाल पन्नास टक्के आरक्षणाची अट मोडली जात आहे का, आरक्षणासाठी राज्यघटनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण या अटी ठेवल्या असतांना आता यात ‘आर्थिक मागासलेेपण’ हा नवा निकष आणल्यामुळे घटनेच्या मूलभूत आराखडयाला धक्का लागत नाही ना, वगैरे महत्वाचे आक्षेप आहेत.
हा निकाल अनेक अर्थाने महत्वाचा आहे. या निकालाने राज्यघटनेचा नवा अर्थ लावला आहे. जगभर न्यायपालिका तिने दिलेल्या निर्णयातून अनेक प्रकारचे पायंडे पाडत असते. उदाहरणार्थ आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाने 1993 साली दिलेल्या इंदिरा साहनी खटल्यात आरक्षणावर पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा घालून दिली आहे. शिवाय ‘आर्थिक निकष’ समोर ठेवून आरक्षण दिले तर ते राज्यघटनेच्या मूलभूत आरखड्याला धक्का लागत आहे का, वगैरे मुद्दे या निकालामुळे निकालात निघाले आहेत. पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडणे न्याय्य आहे असे म्हटल्याबरोबर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना दिलेले दहा टक्के आरक्षण समर्थनीय ठरले. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या आर्थिक आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही, याबद्दल काही अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या निकालाच्या विरोधकांनी घेतलेले आक्षेप समजून घेणे गरजेचे आहे. पहिला मुद्दा म्हणजे पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाचा निर्णय एकमताचा नाही़. तीन न्यायमुर्तींनी पाठिंबा दिला आहे तर दोघांनी विरोध केलेला आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी काही तरी पर्याय शोधला पाहिजे, यावर खंडपीठाचे एकमत आहे. विरोध करणार्‍या दोन न्यायमुर्तींना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी असलेल्या दहा टक्के आरक्षणातून अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना वगळणे योग्य नाही, असे वाटते. गेल्या काही दशकांतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा अभ्यास केला तर असे दिसते की समानतेच्या तत्वानुसार सकारात्मक हस्तक्षेपाची कृती करण्याचे न्यायपालिकेला समर्थन केलेले आहे. शिवाय भेदभावाची कृती असली तर नुकसानभरपाईचीसुद्धा तरतुद केली आहे. नेमकं याच कारणासाठी न्यायपालिकेने ‘लाभार्थी गट’ म्हणजे नेमके कोण आणि त्यांची शास्त्रशुद्ध व्याख्या काय, असे योग्य प्रश्‍न उपस्थित केले होते. शिवाय ज्या दुर्बल गटांना आरक्षण देण्याची शिफारस आहे ते गट ते आरक्षणास पात्र आहेत, याचे ठोस पुरावे न्यायपालिकेने मागितले होते. ताज्या निकालाने हे जुने आक्षेप मागे पडल्याचे दिसत आहे.
या संदर्भात काही आकडेवारी समोर ठेवणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेल्या अनुसूचित जातींच्या यादीत 28 राज्यांतील 1108 जाती आहे. अनुसूचित जमातींच्या यादीत 744 जमातींचा समावेश आहे. 1990 नंतर लागू झालेल्या मंडल आयोगानुसार प्रत्येक राज्यातील ओबीसींची यादी वेगवेगळी असल्याचे दिसून येते. आपल्या महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त ओबीसी आहेत. या खंडपीठात असलेल्या काही न्यायमुर्तींनी आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याची गरज नोंदवली आहे. आपल्या देशात हे धोरण 1952 सालापासून लागू झालेले आहे. आता या धोरणाला सुमारे सत्तर वर्षें होत आहेत. अशा स्थितीत गेल्या सत्तर वर्षांतला अनुभव डोळ्यांंसमोर ठेवत या धोरणात कालोचित बदल केले पाहिजेत.
हा निकाल थोडासा क्लिष्ट आहे, अशीही टिका होत आहे. हा निकाल देतांना मुख्य न्यायधीश उदय लळित आणि न्यायमुर्ती भट या दोन न्यायमुर्तींचं मत एका बाजुला तर दुसरीकडे तीन न्यायमुर्तींची मत अशी विभागणी झाली. 103 वी घटनादुरूस्ती सादर केली तेव्हा त्यात ‘खुल्या वर्गातले आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक’ असा शब्दप्रयोग होता. आताच्या निर्णयानुसार त्यात बदल करण्यात आला असून आता खुल्या वर्गाबरोबरच अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीमधील आर्थिक दुर्बल असा बदल केला आहे. या आरक्षणाला पात्र होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असावे असे मान्य केले आहे. मात्र ही आठ लाखाची मर्यादा कशाच्या आधारे ठरवली याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. आताच्या निर्णयानुसार या वार्षिक उत्पन्नात शेतीचे उत्पन्न धरण्यात येईल. आधीच्या निकषांत शेतीचे उत्पन्न धरण्यात येत नव्हते. शिवाय ‘इतर उत्पन्न’ सुद्धा धरण्यात येणार आहे. पण या इतर उत्पन्नात कोणते उत्पन्न येते, याबद्दल स्पष्ट सूचना नाहीत.
या मर्यादा लक्षात घेतल्या तरी हा निर्णय आपल्या देशातील आरक्षणाच्या धोरणाच्या संदर्भात दूरगामी महत्त्वाचा आहे यात वाद नाही. या निणर्यावर अजुनही बरेच दिवस उलटसुलट चर्चा होईल. यातील अनेक मुद्द्यांवर देशातले विद्वान चर्चा करतील. त्यानंतरच हे नवे आरक्षण प्रत्यक्षात येऊ शकेल. मात्र जातींच्या आधाराप्रमाणे गरीबी हा सुद्धा मुद्दा ध्यानात घेतला पाहिजे ही तशी फार जुनी मागणी होती. ती या निर्णयाने पूर्ण झाली याचे समाधान नक्कीच आहे.
 (0989 210 3880)

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

जुन्या पेन्शनचे स्वप्न

Next Post

अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने एकाची हत्या

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
काशीद येथे अज्ञात व्यक्तीचा खून

अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने एकाची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?