मंडप डेकोरेशन साहित्याच्या गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू, पाचजण गंभीर

। खापोली । संतोषी म्हात्रे ।
मुंबई- पुणे महामार्गावर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मॅजिक पॉईंटजवळ (अंडा पॉईंट) बोरघाट येथे सहारा सिटी येथून मंडप काम करून मुंबईकडे परतणार्‍या डेकोरेशन साहित्याच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील टपावर बसलेले 22 जण खाली कोसळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी झाले. तर किरकोळ जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, खोपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरुन पनवेलकडे उतरत असताना मिळ ठाकूरवाडी जवळ हा अपघात घडला.

यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नावे पुढिलप्रमाणेः
1.जयप्रकाश यादव
2.रवींद्र मोरे
3. प्रमोद बुधाप
4. कृष्णा आगापे
5. मंगेश काटकर
6. सचिन विर
7. मंगेश पोरनाथ
8. मनोहर काटकर
9. विलास काटकर
10. अमित शिगवण
11. संजय सिंग
12. मुकुंद बूधाप
13. योगेंद्र शहाणे
14. राजाराम वीर
15. राकेश तिवारी
16. विशाल जाधव
17. दिपक जाधव
18. प्रभाकर भोपिवले

Exit mobile version