| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय रिझर्व्ह बँक येत्या 1 एप्रिलपासून बँकिंग नियमात बदल करणार आहे. बँकिंग सिस्टमला आणखी सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच ग्राहकांना सर्व व्यवहार सोयीचा जावा यासाठी हे नियम बदलणार आहे. हे नियम एसबीआय, पीएनबी, कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेसह अनेक बँकांना लागू होणार आहेत. सर्वात आधी बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे होणार आहे. तसेच, बचत खाते असलेल्या बँकधारकांना आता आधीच्या तुलनेत जास्त रक्कम आपल्या खात्यात ठेवावी लागेल. जर ही रक्कम ठेवली नाही, तर दंड बसू शकतो. दुसरा बदल म्हणजे 1 एप्रिलपासून एटीएम ट्रान्झॅक्शन शुल्कात बदल केला जाणार आहे. सध्या दिली जाणारी फ्री एटीएम ट्रान्झॅक्शनच्या संख्येत कपात केली जाण्याची शक्यता आहे. दुसर्या बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. सध्या 3 ते 5 वेळा फ्री पैसे काढता येतात. नव्या नियमात अतिरिक्त प्रति ट्रान्झॅक्शनवर 20 ते 25 रुपये चार्ज लागू शकतो.