सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील खडसांबळे येथे दरवर्षी प्रमाणे विठ्ठल रुक्मिणी सोहळा संपन्न झाला. यावेळी गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजाचे भव्य स्मारक उद्गघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सुधागड किल्ल्यावरून पेटती मशाल स्मारकाजवळ आणण्यात आली. मिरवणूक काढण्यात आली. तसेच रात्री महा. अंनिसच्या वतीने चमत्कार सादरीकरण प्रयोग करण्यात आले.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खडसांबळे गावात श्री शिवस्मारक उभारण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी माझे मन गहिवरून गेले आहे असे राजीप सदस्य सुरेश खैरे यावेळी म्हणाले. अंनिसचे पाली शाखा अध्यक्ष अमित निंबाळकर यांनी चमत्कार प्रयोग सादरीकरण केले. त्यांना प्रवीण पालकर यांनी सहकार्य केले.
उद्घाटन सोहळा रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पडवळ, सरपंच विद्या विजय धानुधरे, शंकर वीर, सुधीर सावंत मनोज शिंदे, विजय धानुधरे, गणपत वरगडे, ग्रामस्थ व शिवप्रेमी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.