मासेमारी बोटींनी किनाऱ्यावर टाकला नांगर
| उरण | प्रतिनिधी |
मासेमारीचा नवा हंगाम सुरू होऊन केवळ आठवडा लोटला आहे. मात्र खोल समुद्रात वादळी वारे वाहू लागल्याने बोटींनी कोकणातील विविध बंदरात नांगर टाकले आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसाला फटका बसला आहे. लकरच वातावरण निवळून पुन्हा बोटी समुद्रात जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मच्छिमारांना मिळणाऱ्या तेल कोट्याची प्रतीक्षा कायम आहे. मासेमारीला शेतीचा दर्जा मिळूनही मासळीला हमीभाव नाही. नुकसान भरपाई मिळत नाही. मासेमारीसाठी कर्ज काढल्याने आर्थिक टंचाई सुरू आहे. मासळीचे उत्पादन कमी आहे. अशा संकटांचा सामना करत असतानाच त्यात हंगामाच्या सुरुवातीलाच वादळीवाऱ्यामुळे व्यत्यय आल्याने मच्छिमारांची चिंता वाढली आहे.
रायगडमधील काही मासेमारी बोटी जयगडच्या किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. तर करंजा बंदरातील बोटी थांबल्या आहेत. मच्छिमारांना या संदर्भात धोक्याचा इशारा देणारे पत्र मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहे.
जलील पटेल,
सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड
सरकारने खास करून मत्स्यव्यवसाय विभागाने जे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करणे अवघड बनले आहे. त्यात या वादळी स्थितीचा फटका बसत आहे.
विनायक पाटील,
व्यवसायिक







