| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड, धामणपाडा हद्दीतील रहिवासी दीपक अनंत धुमाळ यांचे वयाच्या 48 व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवार, (दि.3) मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली, मुलगा शिवम, मुलगी आदिती, जावई, नातू असा मोठा परिवार आहे.
एक विश्वासू , प्रामाणिक तसेच कधीही कामचुकार न करता राज्य परिवहन महामंडळात उत्कृष्ट चालक म्हणून 15 वर्षे सेवा केली. मूळ गाव धामणपाडा गावातील रहिवासी असलेले धुमाळ सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आदीमध्ये सक्रीय सहभाग घेत असत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण धामणपाडा, पोयनाड परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर धामणपाडा गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, एकतारी भजन मंडळ, ग्रामस्थ मंडळ, क्रीडा मंडळातर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित सर्वांच्या वतीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. कै. दीपक धुमाळ यांचे उत्तरकार्य बारावा मंगळवार, (दि.14) मे रोजी राहत्या घरी होणार आहे.