| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रा.जि.प. शाळा खानाव येथे दिवाळीनिमित्त मुख्याध्यापक रवींद्र थळे उपशिक्षिका नीलम बुरांडे, संजीवनी थळे, संतोष पालकर, मनीषा बलकवडे, सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक सहभागी झाले होते. यावेळी गड किल्ल्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मातीपासून किल्ले बनवले. तसेच, आकाश कंदिल बनवणे, पणत्या रंगवणे, विविध प्रकारची शुभेच्छा पत्र तयार करणे,रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 105 विद्यार्थी व शिक्षक व पालकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.







