। सोगाव । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी सोगाव व चोरोंडे येथील आदिवासी बांधवांसह मुनवली ग्रामस्थांची मोफत दिवाळीचा शिधा वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली आहे. घाडी हे गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या भागातील गरीब व गरजू बांधवांना दरवर्षी दिवाळीचा शिधा न चुकता वाटप करत आहेत. यावेळी सचिन घाडी यांनी सोगाव व चोरोंडे येथील आदिवासी वाडीवरील बांधवांना याहीवर्षी दिवाळी पुर्वी प्रत्येक घरोघरी जाऊन रवा, मैदा, साखर व इतर तत्सम वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. याबाबत आदिवासी बांधवांनी व मुनवली ग्रामस्थांनी सचिन घाडी यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.







