बोगस अकाऊंटवरून महिलेची बदनामी

अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल

। कर्जत । प्रतिनिधी ।

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोगस इंन्टाग्राम अकाऊंट उघडून महिलेची बदनामी करणार्‍या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18 सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तो इसम अथवा अज्ञात व्यक्ती महिला फिर्यादी या नसताना वाईट हेतुने फिर्यादी यांचे नाव फोटो असलेले इंन्टाग्राम अकाऊंट अशी फिर्यादी यांची खाजगी माहीती इंस्टाग्राम या सोशल साईटवर देऊन त्याद्वारे फिर्यादी यांच्या नावाचे बोगस इंन्टाग्राम अंकाऊंट उघडून त्या अकाऊंटवर जाणीवपुर्वक प्रोफाईल फोटो म्हणुन फिर्यादी याचा फोटो ठेवुन त्या अकाऊंट वरुन फिर्यादी याचे मोहिली गावातील महिला साक्षीदार हिच्याशी फिर्यादी यांना मुल होत नाही म्हणुन अश्‍लिल चॅटिंग करुन फिर्यादी यांची बदनामी केली.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.252/2021 भा.दं.वि.क.500 माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 66 उ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की करीत आहेत.

Exit mobile version