धर्माच्या आड लपलात तरीही पराभव

नवाब मलिकांची योगींवर टीका
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्लीतील हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनाही संसर्ग होत आहे. दिल्लीत जवळपास 700 ते 800 डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या डॉक्टरांना 7 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर कोणतीही चाचणी न करता त्यांना ड्युटीवर रुजू होण्याचा सल्ला दिला जात आहे, दिल्लीच्या ईएसआय हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर रोहन कृष्णन यांनी ही माहिती दिली.
दिल्लीतील हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिल्लीतील केवळ पाच मोठ्या हॉस्पिटल्समधील 800 हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कात आलेले डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारीही आयसोलेशनमध्ये आहेत. हॉस्पिटल्समधील सर्वात वाईट स्थिती दिल्लीच्या एम्समध्ये आहे. एम्समध्ये काम करणारे सुमारे 350 निवासी डॉक्टर कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हा आकडा फक्त कोविड पॉझिटिव्ह निवासी डॉक्टरांचा आहे, प्राध्यापक, पॅरामेडिकल कर्मचारी जोडले तर हा आकडा खूप मोठा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीतील इतर मोठ्या हॉस्पिटल्सची हीच स्थिती आहे. सुमारे 80 ते 100 डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत, असे असे सफदरजंग रुग्णालयातील सूत्रांनीही सांगितले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील 100 हून अधिक डॉक्टरांना करोना संसर्ग झाला आहे. दुसरीकडे, लोकनायक रुग्णालयातील 50 ते 70 निवासी डॉक्टर आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे 150 निवासी डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आहेत.

कोरोनामुळे नवीन प्रोटोकॉल
उत्तर प्रदेशमध्ये 10, 14 , 20, 23 , 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कोरोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

Exit mobile version