। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतातल्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा करोना संसर्ग झाला आहे. केरळमधली मेडिकल स्टुडंट असलेली महिला भारतातला कोरोनाचा पहिला रुग्ण ठरली होती. तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्य विभागाकडून मिळत आहे. तिची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आहे. तिला सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, अशी माहिती थ्रिसूरच्या आरोग्य अधिकार्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. त्यांनी सांगितलं की, तिला शिक्षणासाठी दिल्लीला जायचे होते, म्हणून तिने आपल्या चाचण्या केल्या. त्यात तिची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून, ती सध्या गृहविलगीकरणात आहे.