तांत्रिक बिघाडाने ते मिसाईल पडले; संरक्षणमंत्र्यांचा खुलासा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानने अलीकडेच भारतावर आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. भारताच्या बाजूने आलेलं मिसाईल पाकिस्तानात 124 किलोमीटरच्या आत खानवाल जिल्ह्यात पडल्याचा दावा करण्यात आला होता. पाकिस्तानकडून संबंधित भागाच्या तपासणीसाठी पथक देखील पाठवण्यात आलं.
तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे भारताने स्पष्ट केले होते. यानंतर अमेरिकाही भारताच्या बाजूने आली. ही केवळ अपघाती घटना असल्याचं अमेरिकेने म्हटले आहे, हा मुद्दाम केलेला हल्ला नव्हता, असं म्हणत अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. यावर स्पष्टीकरणही देण्यात आलंय. अखेर संपूर्ण प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले. हा अपघात झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय. भारताचं क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याचं नंतर कळलं. ही घटना खेदजनक आहे,असं राजनाशसिंह म्हणाले. मात्र कोणतेही नुकसान झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली.
या घटनेचे नेमके कारण तपासातूनच कळू शकेल, असं ते राजनाथसिंह म्हणाले. ऑपरेशन्स, देखभाल आणि तपासणीच्या संपूर्ण कार्यप्रणालीचा देखील आढावा घेतला जात आहे, असं स्पष्टीकरण संरक्षण मंत्र्यांनी संसेदत दिलं.

Exit mobile version