केळवणे येथे संरक्षण भिंत भुमीपुजन सोहळा उत्साहात

। जेएनपीटी । वार्ताहर ।
केळवणे गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या संरक्षण भिंतींच्या कामांचा शुभारंभ केळवणे गावातील शेकापचे ज्येष्ठ नेते हिराजी शंकर शिवकर यांच्या हस्ते करण्यात आला.

केळवणे गावातील वाघेश्‍वर टेकडीवर जाण्याचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे 250 घरांची लोकवस्ती असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तो वेळीच दुरूस्त केला नाही तर भविष्यात कोणताही अपघात होण्याचा धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर घरत व पनवेल पंचायत समिती सदस्या मनिषा मोरे यांनी संयुक्त निधीतून या रस्त्याच्या कडेला चार फुटांची भिंत बांधण्याचे योजले. त्याचा शुभारंभ अनंत चतुर्दशीच्या दिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि.20) ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी जि.प.सदस्य ज्ञानेश्‍वर घरत आणि पनवेल पंचायत समितीच्या सदस्या मनिषा मोरे, शेकापचे ज्येष्ठ नेते हिराजी शंकर शिवकर तसेच पनवेल शेकाप सरचिटणीस ज्ञानेश्‍वर मोरे, सरपंच अश्‍विनी घरत, उपसरपंच रेश्मा गावंड, माजी सरपंच दामाजी शिवकर, गुरूराज ठाकुर, प्रकाश शिवकर, तेजश पाटील, दत्तात्रेय शिवकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version