मात्र पालिका सकारात्मक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेने शहरातील 20 हजार नागरिकांना मालमत्ता करवाढ बाबत चतुर्थ वार्षिक करवाढ साठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्याविरुद्ध कर्जतकर नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी एकत्रितपणे आम्ही कर्जतकर मोहीम हातात घेतली आहे. त्या माध्यमातून पालिकेला शेवटचा अल्टिमेटम देण्यासाठी नागरिक बुधवारी( 11 जानेवारी) नगरपरिषद मध्ये पोहचले होते. दरम्यान, कर्जत नगरपरिषद देखील चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केली जाऊ नये यासाठी सकारात्मक असून काही दिवसात लेखी आश्वाासन दिले जाईल असे सर्व नागरिकांपुढे स्पष्ट करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी आंदोलन
नागरिकांना चतुर्थ वार्षिक मालमत्ता करवाढ बाबत नागरिकांना नोटिसा पाठवण्यात आल्यानंतर शहरातील नागरिक 20 डिसेंबर पासून आक्रमक झाले आहेत.त्यानंतर नागरिकांनी पालिकेत येऊन आपल्या समस्या मांडल्या,त्यानंतर आम्ही कर्जतकर म्हणून सर्वांच्या तक्रारी आणि समस्या हरकती यांचे निवेदन पालिकेला दिले आहे. मात्र त्यावर पालिकेकडून कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याने 26 जानेवारी रोजी आम्ही कर्जतकर शहरातील लोकमान्य टिळक चौकात आंदोलन करणार आहेत.
कार्यालयीन अधीक्षक गोसावी आणि सुदाम म्हसे यांनी नागरिकांच्या प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी अॅड. कैलास मोरे, प्रवीण गांगल,माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रमाकांत जाधव,विनोद पांडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.त्यावेळी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ प्रशासन आणणे नाही अशी ग्वाही पालिकेच्या वतीने जितेंद्र गोसावी आणि सुदाम म्हसे यांनी दिली. त्यावेळी नागरिकांनी शहरात घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यासाठी फिरत असलेली रिक्षा तात्काळ बंद करा अशी सूचना करण्यात आली. हा निर्णय होईपर्यंत कोणत्याही नागरिकाला कराबाबत आग्रह करू नये अशी मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. या चर्चेत अभिषेक सुर्वे,जयेश म्हसे,दिनेश देवधर,अजय वर्धावे,निलेश हरिचंद्र,गणेश डागा,अशोक देशमुख,युसूफ खान,सचिन हुलावळे,प्रमोद जोशी,भरती कांबळे,अरुण पाटील,अमोल जैन,डॉ जंगम,प्रशांत सदावर्तेउमेश भोपतराव,मण्यार, यांच्यासारख्या असंख्य नागरिकांनी भाग घेतला.
मालमत्ता करवाढीबाबत पालिका नागरिकांच्या सोबत असून नागरिकांना सहकार्य करणार आहे. जिल्हाधिकारी आणि नगररचना विभाग त्यासाठी पात्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर नागरिकनांच्या हिताचा निर्णय अपेक्षित असेल – जितेंद्र गोसावी, कार्यालयीन अधिक्षक