गाडी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकावर कारवाईची मागणी – अ.वि.जंगम

| श्रीवर्धन | वार्ताहर |

एस.टी.बस चालवीत असतांना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी को.म.सा.प.चे जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम यांनी केली आहे. 28 ऑगस्ट 23 रोजी सकाळी 10 वा.च्या सुमारास माणगाव-तळा या एस.टी.बसने माणगाव ते विघवली असा प्रवास करीत असताना सदर बसचे चालक हे एका हातात मोबाईल धरुन चक्क त्यावर बोलत होते असे जंगम यांचे म्हणणे आहे. सदर गाडी रोहा डेपोची होती. जंगम यांना विघवली फाटा येथे उतरायचे होते.चालक मोबाईलवर बोलण्यात दंग असल्याने बसचे वाहक भोसले यांनी बेल मारूनही बस स्टॉपवर न थांबता स्टॉपच्या पुढे जाऊन थांबली. कोशिंबळेच्या अवघड चढणीच्या वळणापासून चालक मोबाईलवर बोलत होते असे जंगम यांचे म्हणणे आहे. वाहन चालवीत असतांना मोबाईलवर बोलण्याने अनेक अपघात होतात. तसे नकरण्याचा नियम असतांनाही सदरचे चालक मोबाईलवर बोलत होते. तरी अशा रीतीने बस चालविताना एका हातात मोबाईल घेऊन त्यावर बोलणऱ्या रोहा डेपोच्या सदर गाडीच्या चालकाची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version