अमली पदार्थ विक्री तथा सेवन करणार्‍यांवर कारवाईची मागणी

| उरण | वार्ताहर |
उरण परिसरात अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्‍यांची संख्या वाढत चालली असून त्यात मुख्यत्वे तरुणाई या व्यसनाला बळी पडत आहेत. या प्रकारांस आळा बसण्याच्या उद्देशाने उरण शहरातील जागरूक नागरिकांनी नुकतेच उरण पोलीस ठाण्यात सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्राप्तीनंतर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कारवाई करण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू, असे आश्‍वासन सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिले.

Exit mobile version