| पनवेल | प्रतिनिधी |
एप्रिल महिना मध्यावर आला असून, कडक उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पनवेलकरांचा एसी, कूलर आणि फ्रीज घेण्याकडे वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून कडकडीत उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पनवेलचा पारा 38 ते 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. परिणामी पनवेलकरांची पावले एसी, कूलर आणि फ्रीज अशा वस्तू घेण्याकडे वळू लागली आहेत.
उन्हापासून दिलासा मिळावा, या हेतूने पनवेलकरांच्या या वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी करू लागले आहेत. यामुळे एसी, पंखे, कूलर, फ्रीज या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन, दुकानदारांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात शिवाय इतर युक्त्या वापरून या साधनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न चालवला आहे.सध्या बाजारात पंख्यांना असलेली मागणी कमी झाली असून, ग्राहकांचा ओढा एसी आणि कूलर घेण्याकडेच जास्त आहे. तर सामान्य नागरिकांना एसीची खरेदी आवाक्याबाहेरची वाटत असल्याने त्यांनी कुलरला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. दररोज 6 ते 7 कूलर व 3 ते 4 एसी विक्रीला जात असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली आहे, तर मोठ्या दुकानांत हेच प्रमाण 25 ते 30 कूलर व 10 ते 15 एसी इतके असल्याचे सांगण्यात आले आहे. तर फ्रीजची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.उन्हाचा कडाका वाढल्यामुळे रोज दुकानांमध्ये एसी व कूलर घेण्यासाठी ग्राहकांची रीघ लागत आहे. काहीजाण है लग्नसराई सुरू असल्यामुळे एसी किया कूलर भेट देण्यासाठी खरेदी करीत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मागील वर्षे एवढीच किंमत यंदादेखील आहे. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण वाढले असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत.