| उरण | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस, रेवदंडा, साळाव, राजपुरी-दिघी या खाडीवरून रेवस-रेड्डी हा महामार्ग जात आहे. बाधितांना नुकसान भरपाई न देता ऍफकॉन कंपनीने काही ठिकाणी खाडीत महाकाय अशा जेकब बार्जेसने सर्वेचे काम सुरू केले आहे. तर, करंजा- रेवस खाडीत करंजा गावाच्या बाजूकडून प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, या पुलामुळे स्थानिक महिला व पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा रोजगार बंद झाला आहे. त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन पुलाचे बांधकाम दोन-तिन वेळा बंद पाडण्यात आले होते. याअगोदर करंजा टर्मिनल हे बंदर 400 एकर भर समुद्रात उभारण्यात आले आहे. परंतु, बाधितांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आतासुद्धा अशिच साधक भिती ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे रेवस-रेड्डी महामार्गासंबंधित जबाबदार अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा, त्याकरिता नायब जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले.






