| माणगाव | प्रतिनिधी |
राज्यातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत तसेच भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद शिक्षकांचा ही समावेश होण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे निवेदन सादर करण्यात आले.
याविषयी 10 जून 2014 च्या अधिसूचनेत योग्य तो बदल होऊन पात्रताधारक जिल्हा परिषद प्रशिक्षकांना पात्र ठरून व वयाची सवलत देऊन शक्य तितक्या लवकर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेद्वारे विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख पदांची भरती करण्यात यावी. अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजेश सुर्वे यांनी आणि प्रसिद्धी प्रमुख रविकिरण पालवे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.