विरार-अलिबाग कॉरिडॉरचा मोबदला वाढणार?

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| मुंबई | प्रतिनिधी |

विरार-अलिबाग कॉरिडॉर आणि खावडा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य मोबदल्यासाठी नुकतीच महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुले यांच्या दालनात त्यांनी तिसऱ्यांदा हा विषय मांडला. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी ‌‘फॅक्टर 2‌’नुसार जास्तीत जास्त मोबदला देण्याची ठाम मागणी करण्यात आली. या मागणीची सकारात्मक दखल घेत महसूलमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना शेतजमिनींचा फेरप्रस्ताव तयार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार आणि बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version