। मुंबई । दिलीप जाधव ।
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कोकणातील भजन मंडळींना आणि लोककलाकारांना, साहित्यिकांना मानधन मिळण्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक गठित करणार असल्याचे विधानसभेत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत आश्वासन दिले.
भजनीबुवा, टाळ मृदुंग वाजविणारे, भजनात साथ देणारे कोरस, वासुदेव, कोळी गावठाणातील भजनी मंडळ तसेच नाटक, तमाशातील कलावंत, वृद्ध कलावंत, खडी गंमत, पोतराज, चित्रकथी, बहुरूपी, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, लोककलाकारांना मानधन, पेंशन मिळण्यासाठी शासन सकारात्मक आहे असं अमित देशमुख यांनी सांगितले. विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक घेऊन लोक कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच सोडवू तसेच आपल्याला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा हा प्रश्न उपस्थित करावा लागणार नाही असे आश्वासन देशमुख यांनी सभागृहात दिले.