राष्ट्रपुरुष यादीत संभाजी महाराजांचा समावेश करण्याची मागणी

। रसायनी । वार्ताहर ।
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रपुरुष थोर व्यक्तीची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंबंधीची दिनविशेष यादी तयार केली जाते.त्या यादीमध्ये अद्यापपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तीमत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला वंदनीय आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने सन 2022 पासून राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींच्या जयंती व राष्ट्रीय दिन विशेष यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती 14 मे समाविष्ट करुन मंत्रालय तथा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड सह नागरिकांतून होत आहे. याबाबत रायगड जिल्हाधिकारी, खालापूर तहसिलदार यांना संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवेदन देवून तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी मागणी केली आहे.

Exit mobile version