| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड शहराचा विकास होत असताना मुरुड मध्ये असंख्य पर्यटक शहरातील ज्या प्रवेश द्वाराने शहरात प्रवेश करतात. त्याठिकाणी आकर्षक कमान बनवावी म्हणजे शहराच्या वैभवात भर पडेल यासाठी मुख्याधिकारी यांनी आकर्षक कमानी बनवाव्यात अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे समाजसेवक व पदमदुर्ग व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी केली आहे. त्यांच्या मागणीचा योग्य तो विचार केला जाईल असे मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले.