घोणसे घाटात गतिरोधक बसविण्याची मागणी

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात ह्या महिन्यात झालेले दोन भीषण अपघात त्यात झालेली मनुष्य हानी व आर्थिक नुकसान. दिघी पुणे राज्य महामार्गावर होणारे किरकोळ अपघात, काही दिवसात झालेल्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळास गौळवाडी ग्रामस्थांकडून गतिरोधकाची मागणी केली होती. वेळास गौळवाडी ग्रामस्थ मंडळ(मुंबई)यांची जनहितार्थ मागणीची दखल घेत सचिन निफाडे यांनी वेळास गावात आवश्यक तेथे वाहनांचा वेग नियंत्रीत व्हावा हा दृष्टीने गतिरोधक बसवले असुन आवश्यक असेल त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यावेळी दिपक दर्गे, अजय खेडेकर, प्रदिप दिवेकर, विवेक मिरगळ उपस्थित होते.

Exit mobile version