कर्जत-मुंबई लोकलची मागणी

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत येथून सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुटणारी लोकल नेहमीच काही न काही कारणांमुळे उशिराने धावत असल्याने लोकल गाडी वेळेवर सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या बाबतीत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.

7. 52 ची कर्जत-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकल खोपोलीहुन येणारी 7. 45 ची खोपोली-कर्जतला जोडणारी दोन्ही लोकल म्हणजेच खोपोली-कर्जत लोकल व कर्जत-छत्रपती शिवजी महाराज टर्मिनस एकमेकावर अवलंबून असते. त्यामुळे यापैकी एक जरी लोकल उशीरा धावत असेल तर लोकल गाड्या उशिराने सोडण्यात येतात. कर्जत-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलने प्रवास करणारे प्रवासी हे सरकारी कर्मचारी, बँक, कोर्ट, खासगी कंपनीमध्ये काम करणारे प्रवासी आसतात. या लोकलने प्रवास करण्यार्‍या नोकरदारांना कामाला जायला उशिरा होत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होते.

रेल्वे प्रशासनाने कर्जत मुंबई लोकल वेळेवर सोडाव्यात, जेणे करून प्रवाशांना विशेषतः नोकरदारांना आर्थिक नुकसान होणार नाही. यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत.

पंकज मांगीलाल ओसवाल,
सामाजिक कार्यकर्ते,

Exit mobile version