| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा आणि श्रीवर्धन तालुका दुर्गम व डोंगराळ भाग असल्यामुळे वाहतुकीची साधनाचा अभाव तसेच ग्रामीण भागतील शिक्षित प्रमाण खुप कमी असल्याने संतती नियमन बाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. तालुका स्तरावर तालुका आरोग्य केंद्रात संतती नियमन सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी म्हसळा नगरपंचायतीच्या नगरसेविका राखी करंबे यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला लेखी पत्र देऊन केली आहे. यावेळी अमित महामुनकर, अजय करंबे, दीपल शिर्के, अभय कलमकर, राहुल जैन, कल्पेश जैन, रिना रणावडे, कविता गठडी उपस्थित होते.