विद्युत खांब बदलण्याची मागणी

| सुधागड -पाली । वार्ताहर ।

जांभुळपाडा अंगणवाडी शेजारील व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे असलेला विद्युत खांब खाली गंजला असून जीर्ण होऊन तिथे छिद्रे पडली आहेत. त्यामुळे हा विद्युत खांब धोकादायक झाला आहे. या संदर्भात वर्‍हाड जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे रोहित भगत म्हणाले की, येथे अंगणवाडी आहे, शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे. लहान मुले, रुग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका यांची येथे रेलचेल असते. अशावेळी हा दुरवस्था झालेला विद्युत खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. याशिवाय जोराचा वारा आल्यास हा खांब पडू शकतो. पावसाळ्यात तर अधिक भीती आहे. त्यामुळे वीज महावितरण विभागाने लागलीच या धोकादायक विद्युत खांबाची दुरुस्ती करावी किंवा नवीन खांब बसवावा, अशी मागणी रोहित भगत यांनी केली आहे.

Exit mobile version