एसटी सेवा पुर्ववत करण्याची मागणी

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण पूर्व विभागातील विद्यार्थ्यांना आपल्या कामावार व शाळा कॉलेजात ये-जा करण्यासाठी उरण आगारातून सुटणार्‍या एसटी बसेस पूर्वी प्रमाणेच बोकडविरा फुंडे कॉलेज मार्गे सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आगार प्रमुखांकडे करण्यात येत आहे.

बोकडविरा फुंडे कॉलेज मार्गिकेवरून जर एसटी गाड्या सुरू केल्यास शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोयीचा व सुखकर प्रवास करता येईल. तसेच, उरण एसटी आगार प्रमुखांनी आलिबाग, आवरे, केळवणे, खारपाडा, पेण आदी एसटी गाड्या पूर्वीप्रमाणे म्हणजेच बोकडवीरा, फुंडे कॉलेज मार्गिकेवरून हाकाव्यात. जेणेकरुन एमएसईबी स्कूल, एसएस पाटील स्कूल, फुंडे महाविद्यालय, भागूबाई स्कूल अश्या शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात वेळेवर पोहचता येईल. तसेच, पैशांची बचत सुद्धा होईल.

दरम्यान, उरण बस आगार प्रमुखांनी या गोष्टीची वेळीच दखल घेऊन होत असलेली प्रवासी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी उरण पूर्व विभागातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version