| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्मशानभूमी तथा दफनभूमीच्या सुरक्षेकरिता सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक श्रम कामगार युनियननचे सरचिटणीस विनायक गांधी यांनी पनवेलच्या आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. महानगरपालिका हद्दीत एका स्मशानात मृत व्यक्तीला अग्नी दिल्यानंतर त्याची होणारी राखं ही अज्ञात इसमाने चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. अशा प्रकारामुळे भविष्यात परिसरात तणावाचे वातावरण उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिका परिसरात शांतता आणि सुव्यवस्था भंग होण्याची चिन्हे आहेत. याकरिता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.
स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606