| पनवेल | प्रतिनिधी |
पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांनी, महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वीची कामे पुर्ण करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये त्यांनी अय्यप्पा मंदिर ते देवदकडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवावे, नवीन पनवेल प्रभाग 17 येथील उंच वाढलेल्या झाडांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करावी, नवीन पनवेल येथील सेक्टर 12, 18, 19 मधील हरित पट्ट्यातील गार्डन मधील पथवे दुरुस्ती, संरक्षण भिंतीची दुरुस्ती व झाडांची छाटणी करावी. तसेच, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर 12 ते 19 मध्ये असलेल्या उद्यानांमध्ये डेकोरेटिव्ह लाईटचे पोल बसविण्याची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे.







