| पनवेल | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात निर्जन तसेच डोंगर व जंगल परीसरात छुपे गावठी दारूची निर्मीती केंद्रे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांच्या कृपाशिर्वादाने सुरू असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. अंत्यत निर्जन स्थानी गावठी दारूची निर्मीती करून त्यानंतर ती रायगडच्या विविध भागात वितरण केली जात असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील वाईन शॉप, परमिट रूम यांच्या परवनांचे नुतनिकरण 31 मार्चपर्यंत करणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार सबंधीत मालक, चालक आपले परवाना लवकरात लवकर नुतनीकरण व्हावे, या हेतुने सर्व कागदपत्रे, दप्तर तपासणी व बॅकेत चलन भरून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन संपुर्ण नुतनिकरणाचे कामकाज पुर्ण करतात. त्यानंतर संबधीत विविध कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकांकडे पाठविले जातात. परंतु, नुतनिकरणाकरीता आलेल्या कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुटी काढून संबधीत परमिट रूम, वाईन्सशॉप व ईतर व्यावसाईकांना मुख्य साहेबांची भेट घ्यायला भाग पाडतात. त्याशिवाय त्यांच्या नुतनिकरणाच्या कागदावर संबंधित साहेब स्वाक्षरी करीतच नाहीत, असा आरोप रायगड जिल्ह्यातील चालक-मालकांकडून होत आहे. या बाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोन वर्षे चालु असलेली आमची पिळवणुकी थांबवावी व या ठिकाणी एक चांगला कामसु अधिकारी शासनाने नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
उत्पादन शुल्क अधिक्षकांच्या बदलीची मागणी
