। उरण । वार्ताहर ।
मार्च महिन्या पासून उन्हाची काहिली प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेकांनी शीतपेयांकडे मोर्चा वळवला असून आरोग्यवर्धक निराला अधिक पसंती दिली जात आहे.
या भागात कोकण किनारपट्टी असल्याने नारळ आणि शहाळ्यांबरोबरच ताडगोळ्यांची झाडेही मुबलक आहेत. ताडगोळ्याच्या झाडापासूनच नीरा तयार होते.उरण शहरातील पेन्शनर पार्क, उरण शेवा चारफाटा, सिडको फाटा, जासई ते पुढे पनवेल पर्यंत या मार्गावर आवर्जून नीरा विक्रेत्यांच्या टपर्या पाहायला मिळतात .15 रुपये ग्लास ( 200 मिली )दराने मिळत असल्याने स्थानिक नागरिक या आरोग्य वर्धक आणि चविष्ट पेयाला पसंती देतात.
सध्या उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण आहेत, नीरा विक्री ही शासनमान्य असल्याने उरण -पनवेल या रस्त्यावर ठिक -ठिकाणी निरा विक्री केंद्र सुरु असल्याचे दिसते.ेल मार्गावर विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे.
कोरोना काळात निरा केंद्रांना टाळे लागले होते. त्यामुळे नीरा विक्री करणार्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते. पण आता सर्व पूर्व पदावर आले असून निरा विक्रीच्या टपन्या पुन्हा उघडल्याने त्यांना अच्छे दिन आले आहेत.नारळाच्या पाण्यासोबत निरा हे पेयही निसगांचा चमत्कार समजला जाते. ताड, माड, खजुरी, शिंदी या झाडामधून पाझरणारा हा द्रव पोषक आरोग्यवर्धक आहे. ताडाच्या खोडातून निघणारे पाणी मनिराफ म्हणून सर्वत्र उपलब्ध आहे.
निरा पिण्याचे फायदे
ज्यांना हृदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, असे अनेक नागरिक निराचा आस्वाद घेतात. एका दिवसात 1-2 ग्लास निरा पिणे फायदेशीर ठरते.
निरामुळे डिहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. उष्मा करण्यासाठी हमखास निराचा आस्वाद घेतला जातो.
शारीरिक स्वास्थ ठिक राहावे यासाठी महिलाही निरा आवर्जून पितात. शिवाय हे पेय सर्वांनाच परवडणारे आहे.
