वामिकाच्या नावाला आठ कोटींची मागणी

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्याप्रमाणे त्यांची मुलगी वामिका वयाच्या तिसऱ्या वर्षीच प्रसिद्ध झाली आहे. यामुळे वामिकाच्या नावाला इंटरनेटच्या जगात प्रचंड मागणी आली आहे. वामिका डोमेन नेम इंटरनेटवर आठ कोटींपेक्षा जास्त रुपयांना मागितले जात आहे.

वामिका कोहलीच्या नावाला प्रचंड मागणी
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हिचा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी झाला. वामिका या नावाचा अर्थ मां दुर्गाचे स्वरुप आहे. विराट कोहलीने मुलीचे नाव वामिका ठेवल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले. डोमेन नेम देणारी वेब होस्टिंग कंपनीकडे वामिका कोहलीच्या नावाला प्रचंड मागणी आली आहे. जर कोणाला हे डोमेन नेम हवे असेल तर त्याला त्यासाठी 8 कोटींपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. अमेरिकन डॉलरमध्ये ही रक्कम 1 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.

काय असते डोमेन नेम
डोमेन नेम इंटरनेटवर एखादी वेबसाइट किंवा ब्लॉगची ओळख करुन देते. वेबसाईटला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे नाव दिले जाते, त्यालाच डोमेन नेम असे म्हणतात. इंटरनेट वापरकर्ते ब्राउझरच्या बारमध्ये डोमेन नाव टाईप करतात, आणि त्या साईटवर येतात. डोमेन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या वेबसाईटवर जाऊन घेता येते.

Exit mobile version