| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुख्यः रस्त्यातील खड्डे त्वरेने भरा अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेदले जाईल असा इशारा ठाकरे गट तालुका प्रमुख शंकर गुरव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यास दिलेल्या निवेदनात दिला आहे.
तालुका प्रमुख शंकर गुरव यांनी आपल्या सहकार्यांसह हे निवेदन सादर केले आहे. यामध्ये अलिबाग-मुंबई बायपास रस्तावर,अलिबाग-रामराज मुख्यः रस्ता, अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्तात अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. सदर खड्डे त्वरेने भरण्यात यावेत असे दिवाळीपुर्वी निवेदन देण्यात आले होते, मात्र अदयापी कोणत्याही प्रकारे खड्डे भरण्याची कृती सुरू झाली नसल्याने दिवाळी निवेदनानुसार शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेदण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असेल असे निवेदन पत्र सार्वजनिक बांधकाम खाते कार्यकारी अभियंता यांना उध्दव ठाकरे गट शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव यांनी दिले आहे.