नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिकेमध्ये नोकरभरती सुरु आहे. या मध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे. सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाची कोणत्याही प्रकारची पुर्तता केलेली नाही. सिडको हद्दीतील सर्व गावे पनवेल महानगरपालिकेत सामाविष्ट आहेत. प्रकल्पग्रस्तांची शेती सिडकोने हिसकाऊन घेऊन प्रकल्पग्रस्त नागरीकांना सिडकोने वाऱ्यावर सोडलेले आहे. त्यांचे विकासाचे कोणतेही काम आजतगायत केलेले नाही. दरम्यान महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त नागरीकांना व स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे व कोव्हिड- 19 मुळे गेलेली दोन वर्षाची वयाची अट सुध्दा वाढवून द्यावी तसेच स्थानिकांना रोजगार द्यावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे, राजेश मोहिते उपस्थित होते.

Exit mobile version