• Login
Saturday, June 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा

Antara Parange by Antara Parange
June 20, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तालुका चिटणीस सुरेश घरत आक्रमक

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेदरम्यान सर्वसामान्य ग्राहकांवर सक्ती केली जात असून, विरोध करणाऱ्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी महावितरणवर केला आहे. अलिबाग तालुक्यातील वरसोली आदिवासीवाडीत शनिवारी (दि.20) सकाळी घडलेल्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेवर संताप व्यक्त करत सुरेश घरत यांनी स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

महावितरण कंपनीकडून शहरी भागासह ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी सकाळी वरसोली आदिवासीवाडीत महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, याबाबत स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कर्मचारी मीटर बसविण्याचे काम करीत असताना काही आदिवासी ग्रामस्थ व महिलांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्यास तक्रार दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

हे प्रकरण पुढे अलिबाग पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. घटनेची माहिती मिळताच अलिबागच्या प्रभारी नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीला शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी सभापती अनिल चोपडा, शोधन ठाकरे तसेच महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तायडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी कोणतीही जनजागृती अथवा सूचना दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याची कारवाई करण्याची भाषा वापरून सर्वसामान्य नागरिकांना धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला. महावितरणच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

स्मार्ट मीटरचे फायदे आणि तोटे याबाबत महावितरणकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरमुळे वीज बिले वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असून, अधिकारी व कर्मचारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप ॲड. मानसी म्हात्रे आणि सुरेश घरत यांनी बैठकीत केला.

स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबविण्याची मागणी करत अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावर पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत महावितरण कंपनीने स्मार्ट मीटरबाबत व्यापक जनजागृती करावी, नागरिकांमधील भीती आणि संभ्रम दूर करावा, असे निर्देश दिले. वृत्तपत्रे, ग्रामपंचायत बैठका आणि स्थानिक संवादाच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट मीटर बसविण्याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असून, वीज बिले भरमसाठ येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे महावितरणच्या या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे.

– सुरेश घरत, तालुका चिटणीस, शेकाप

Related

Tags: adv. manasi mhatreindiakrushival mobile appmaharashtramahavitaranMandatory Smart Metersmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newsSmart metersocial media newssocial newssuresh gharat
Previous Post

SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन

Next Post

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल
sliderhome

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल

June 20, 2026
SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन
sliderhome

SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन

June 20, 2026
चौक येथे प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला आग
खालापूर

चौक येथे प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला आग

June 20, 2026
जिल्हा कारागृहात विधी साक्षरता कार्यक्रम
अलिबाग

जिल्हा कारागृहात विधी साक्षरता कार्यक्रम

June 20, 2026
मैत्री ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम
तळा

मैत्री ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम

June 20, 2026
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान
कर्जत

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान

June 20, 2026
Next Post
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?